कणकवली (प्रतिनिधी) : आशिये मुख्य रस्ता ते ग्रामपंचायत जाणाऱ्या रस्त्याचा कामाचे लोकार्पण सामाजिक कार्यकर्ते अनिल गुरव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले . या रस्त्यासाठी जनसुविधा योजनेतून पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सरपंच महेश गुरव यांच्या पाठपुराव्याने निधीची तरतूद झाली होती.
यावेळी आशिये सरपंच महेश गुरव , उपसरपंच संदीप जाधव, माजी सरपंच, शंकर गुरव, माजी उपसरपंच प्रवीण ठाकूर, पांडुरंग बाणे, ग्रा.प.सदस्य सुहास गुरव , बाबा उर्फ भिवा गुरव, बाळकृष्ण गुरव, बाळकृष्ण पुजारे, श्रीधर माणगावकर, धोंडू माणगावकर, मंगेश गावडे, प्रकाश पांचाळ, प्रमोद पांचाळ, प्रवीण गुरव, गणेश गुरव, बाबाजी गुरव, विनोद पुजारे, रवींद्र पुजारे, रत्नागर गुरव, धोंडू गुरव, मिलिंद गुरव, निलेश पुजारे, अमित गुरव, चंद्रकांत गुरव, संजय बाणे, ग्रामसेवक राकेश गोवळकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
