कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात जिल्हाध्यक्ष अबिद नाईक पुरस्कृत हुमरठ मुस्लिम वाडी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेचे उदघाटन जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते नारळ वाढून व फित कापून करण्यात आले. त्यावेळी हुमरठ गावाचे ग्रामपंचायत मा.उपसरपंच मुश्ताक काझी, हुमरठ ग्रामपंचायत सदस्य सुयोग मानगावकर ,सईद काझी, फारुख काझी, हानीफ काझी, वासिम शेमना,असीम शेमना,अझर शेख, दिलदार शेख, इस्माईल शेख, सोहेल काझी, सलीम शेमना ,मस्जिद शेख आदी उपस्थित होते.




