सुविद्या इन्स्टिट्यूटचे संस्थापक वसंत मेस्त्री यांचा स्मृतिदिन अनोख्या पद्धतीने साजरा

ज्ञानदिप विद्या मंदीर वायंगणी हायस्कूलचे दोन विद्यार्थी दत्तक

उद्योजक प्रकाश मेस्त्री यांचे दातृत्व !

आचरा (प्रतिनिधी) : सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे (मुंबई) संस्थापक अध्यक्ष वसंत दिनकर मेस्त्री, मूळ चिंदर यांच्या व्दितीय स्मृतिदिना (तारखे नुसार) निमित्त आज सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे (मुंबई) संचालक प्रकाश मेस्त्री आणि कुटुंबीय यांनी ज्ञानदिप विद्यालय वायंगणी येथील दोन विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

यावेळी सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक प्रकाश मेस्त्री म्हणाले की आमचे बंधू वसंत मेस्त्री यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंदर सारख्या ग्रामीण भागातून मुंबई सारख्या शहरात जाऊन शिक्षण क्षेत्रात गगन भरारी घेतली, सुविद्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सारखी शिक्षण संस्था बनवून हजारो विद्यार्थी घडवले. जे देशात परदेशात मोठ्या हुद्यावर काम करत आहेत. त्याच बरोबर जपला तो दातृत्व गुण. आणि आज त्याची आठवण म्हणून आम्ही या दोन विद्यार्थ्यांना दत्तक घेतो असे समजतो. मुख्याध्यापक टकले यांच्याकडे या स्वरुपाचे पत्र प्रकाश मेस्त्री यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक टकले, पळसंब सरपंच महेश वरक, संतोष अपराज, दिगंबर जाधव, सिध्देश गोलतकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!