नयना अशोक शिंदे आणि सुलोचना सदाशिव तांबे या सामान्य कुटुंबातील महिलांच्या कर्तबगारीचा सन्मान

विरंगुळा जेष्ठ नागरिक संघटना ठाणे पूर्व कडून करण्यात आला महिलांचा सन्मान

खारेपाटण (प्रतिनिधी) : पुरस्कार आणि सन्मानाने माणसांच्या कर्तबगारीचा, व्यक्तीत्वाचा गौरव होत असतो. समाजासाठी उल्लेखनीय व मोठे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सतत कुठे ना कुठे सन्मान, गौरव होत असतो. अशा महिलांची दाखल घेऊन विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघटना ठाणे पूर्व यांच्यावतीने नयना अशोक शिंदे व सुलोचना सदाशिव तांबे या सामान्य कुटुंबातील महिलांच्या कर्तबगारीचा सन्मान नुकताच ठाणे येथे संस्थेच्या वतीने करण्यात आला.

यावेळी समारंभाच्या अध्यक्ष स्थानी गीता कडू,विशेष शिक्षिका जय वकिल स्कूल काळाचौकी व विशेष अतिथी म्हणून माजी नगरसेविका मालती पाटिल उपस्थित होत्या.ठाणे येथे बैठ्या चाळीत रहाणाऱ्या व घरोघरी जावून घरकाम करणा-या व त्याद्वारे मुलांना चांगले शिक्षण देवून स्वावलंबी बनविणा-या व आज फ्लॅटमध्ये वास्तव्य करणाऱ्या नयना अशोक शिंदे यांना तसेच बैठ्या चाळीत राहणाऱ्या आणि पहाटेपासून दुपारपर्यंत चौकात बसून दुधाचा धंदा करणाऱ्या, चार मुलांना चांगले शिक्षण देणाऱ्या व आज इमारतीमध्ये दोन फ्लॅटमध्ये राहणाऱ्या सुलोचना सदाशिव तांबे यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तळागाळातील स्त्रियांच्या कर्तबगारीचा गौरव करून त्यांना समाजात प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी विरंगुळा जेष्ठ नागरिक संघ नेहमीच पुढे राहिला आहे.व समजातील उपेक्षित महिलांना पुढे आणण्याचे काम केले आहे.

error: Content is protected !!