फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम. एस.) परीक्षेत व सारथी शिष्यवृत्ती पुणे परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटच्या इयत्ता ८ वी मधील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत उज्वल यश संपादन केले आहे. प्रशालेतील खालील ९ विद्यार्थ्यांना एन. एम. एम.एस.शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.या विद्यार्थ्यांना पाच वर्षांत शासनाकडून एकूण ६०,००० रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे
*१) कु.सिद्धी सुधीर पारकर*
*२) पार्थ रवींद्रनाथ गुरव*
*३) कु.ईश्वरी प्रदीप पारकर*
*४) कु.निकिता नरेंद्र घाडी*
*५) कु.दिक्षा अशोक नानचे*
*६) विनायक एकनाथ मोहिते*
*७) कु.अस्मिता संतोष जंगले*
*८) कु.अस्मि प्रशांत मेस्त्री*
*९) कु.मनस्या निलेश फाले*
त्याचप्रमाणे छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती पुणे यांच्या मार्फत देण्यात येणारी सारथी शिष्यवृत्ती प्रशालेच्या खालील ०४ विद्यार्थ्यांनी प्राप्त केली आहे.या विद्यार्थ्यांना सारथी संस्थेमार्फत चार वर्षांत एकूण ४८,००० रूपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
*1) कु.ऋत्वि सुभाष सावंत*
*2) जिग्नेश निशिकांत देसाई*
*3) कु.हर्षिका दशरथ बोबकर*
*4) कु.परब रसिका मारुती*
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम. एस.) परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटच्या इयत्ता 8 वी मधील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत उज्वल यश संपादन केले आहे.प्रशालेतील कु विनायक एकनाथ मोहिते हा विद्यार्थी NTB या प्रवर्गातून जिल्ह्यात प्रथम आला आहे कु मनस्या निलेश फाले ही विद्यार्थिनी NTC या प्रवर्गातून जिल्ह्यात द्वितीय आली आहे कु. सिद्धी सुधीर पारकर GENERAL प्रवर्गातून _जिल्ह्यात_ सहावी आली आहे.
विभाग प्रमुख तुषार तुळशीदास मसगे तसेच समाधान दादासाहेब वाघमोडे सौ दीक्षा दीपक पेडणेकर प्रसाद कृष्णा पारकर ,अजितकुमार विष्णू देठे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले .सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन,सेक्रेटरी, खजिनदार, शाळा समिती चेअरमन , संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक आणि विद्यार्थी यांचेकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
