मालवण तहसील कार्यालय वर्षभरात नव्या दिमाखात दिसेल : जिल्हाप्रमुख दत्ता सामंत

श्रावण तहसील कार्यालय उद्घाटन प्रसंगी प्रांताधिकार्‍यांच्या उपस्थितीत आश्वासन

मालवण (प्रतिनिधी) : श्रावण तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाची इमारत फार जिर्ण झाली होती. येथील कार्यकर्ते, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पाठपुरावा करुन शासनाकडुन वेळेत चांगल्या दर्जाच्या ठेकेदाराकडून चांगले बांधकाम करुन घेतले आहे. अशा इमारतीचे उद्घाटन समारंभ आज माझ्या हस्ते पार पडत आहे. याचा आनंद जनते बरोबर प्रशासनालाही होत आहे. अशीच एक सुसज्ज अशी मालवण तहसिल कार्यालयाची नविन इमारत आम्ही आम. निलेश राणे यांच्या माध्यमातुन बांधू असे आश्वासन प्रांत ऐश्वर्या काळुशे यांच्या उपस्थितीत दत्ता सामंत यांनी मालवण तहसिलदार वर्षा झाल्टे व नागरीकांना दिले.

श्रावण तलाठी कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी, मालवण तहसिलदार वर्षा झाल्टे यांनी आपल्या प्रस्तावनेतून श्रावण तलाठी कार्यालयाच्या बांधकामा प्रमाणे मोडकळीस आलेल्या मालवण तहसिल कार्यालय बांधकामाची मागणी याप्रसंगी केली होती. त्याला सामंत यांनी समाधानकारक उत्तर दिले. दत्ता सामंत पुढे म्हणाले, कुडाळ प्रांत ऐश्वर्या काळुशे मॅडम व मालवणच्या तहसीलदार वर्षा झालटे दोन्ही अधिकारी जबाबदारपूर्वक जनतेसाठी सेवा करत आहेत.

हुशार व प्रशासनात फार शिस्तबध्द आहेत. बदली झाली तरी आम्ही अशा अधिकार्‍यांना सोडणार नाही. तहसिल कार्यालयाच्या नविन इमारती संदर्भात, तिन महिन्यांत रिझल्ट देऊन भुमिपूजनही प्रांत ऐश्वर्या काळुशे यांच्या हस्ते करु. यांच्या बरोबरच श्रावणचे सुपुत्र व आचरा सर्कल अजय ना. परब हे सुध्दा प्रशासनाचे चांगले व योग्य असे काम करतात. अशांची वरीष्ठांकडुन दखल घेणे गरजेचे आहे.

कार्यक्षम आम. निलेश राणे हे अभ्यासपूर्वक विकास करतात. त्यांनी सिंधुदुर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी ६००० कोटींचा आराखडा बनवला आहे. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी कार्यकर्त्यानी जनतेला विश्वासात घेऊन प्रश्न सोडवावेत व पाठपुरावा करुन विकास करावा. असेही सामंत म्हणाले.

प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळुशे या मार्गदर्शनात म्हणाल्या माझ्या उपविभागात तलाठी कमी होते. परंतु आम्ही पाठपुरावा व जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती सादर करुन ४१ तलाठी मिळवले. आज ते चांगले कार्यरत आहेत. परंतु प्रशासनात पारदर्शकता येण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. यावेळी श्रावण तलाठी कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.

यावेळी बाळु कुबल, मालवण माजी नगरसेवक दिपक पाटकर, मालवण माजी उपसभापती राजु परुळेकर, प्रशांत परब, मठ उपसरपंच विनायक बाईत, मनोज हडकर, श्रावण शाळा मुख्याद्यापक विनायक हरकुळकर, श्रावण, आडवली मठ बुद्रुकचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनायक हरकुळकर व उपस्थितांचे आभार, कोळंब मंडळ अधिकारी विनिता चव्हाण यांनी मानले

error: Content is protected !!