आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर मंदिर त्रिंबक येथे श्रीरामनवरात्रौत्सवा निमित्त सिंधुदुर्ग सुपुत्र गोव्यात स्थायिक असलेले सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. किरणबुवा तुळपुळे – डिचोली गोवा यांची कीर्तने ३० मार्च ते ८ एप्रिल २०२५ गुढी पाडवा ते एकादशी पर्यंत आयोजित करण्यात आली होती. तुळपुळे बुवांची कर्नाटक गोवा महाराष्ट्र बडोदा कानपूर मुंबई अशा अनेक ठिकाणी कीर्तने झाली आहेत. दूरदर्शनवर अनेक वेळा त्यांच्या कीर्तन कार्यक्रमांचे प्रसारण झाले आहे. उत्कृष्ट गायन, अभिनय युक्त निरूपण, स्पष्टवक्तेपणा, वैशिष्ट्ये आहेत. राष्ट्रभक्ती वरील कीर्तने राष्ट्रभक्ती जागृत करणारी असतात. कीर्तनात कोणताही विरश्रीचा तसेच, करूण रसाचे प्रसंग मनाचा ठाव घेणारे असतात, ते उत्कृष्ट दशावतारी नाट्यकलाकारही आहेत, नारद या भूमिकेसाठी त्यांना हे प्रथम पारितोषिके मिळाली आहेत, राजा, इंद्र, नारद, अर्जुन, विरभद्र, अशा अनेक भूमिका त्यांनी साकारलेल्या आहे. त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत, मागीलवर्षीप्रमाणे यावर्षीही त्रिंबक च्या श्रोत्यांना त्यांच्या बहारदार कीर्तनाचा लाभ मिळाला, त्यांना संवादिनीवर – गजानन गद्रे ( नारिंग्रे) व तबल्यावर तुषार सुतार ( पुरळ) यांची उत्कृष्ट साथ लाभली.
त्रिंबक येथे श्रीराम नवरात्रौत्सवात किरण बुवा तुळपुळे यांची कीर्तने संपन्न….!
