सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातून 40 बिल्डर्स ,डेव्हलपर्स सहभागी
75 प्लॉट आणि फ्लॅट्स चे झाले स्पॉट बुकिंग
मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज पार्क क्रीडा भवन, दादर, मुंबई येथे 4 एप्रिल ते 6 एप्रिल दरम्यान आयोजित सिंधुदुर्ग प्रॉपर्टी प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे 5 हजार जणांनी भेट दिलेल्या या प्रॉपर्टी प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक 4 एप्रिल रोजी क्रेडाई महाराष्ट्र चे ज्येष्ठ कार्यकारी सदस्य आणि नवी मुंबई क्रेडाई चे नवनिर्वाचित अध्यक्ष रसिक चौहान आणि क्रेडाई महाराष्ट्र चे उपाध्यक्ष विदयानंद बेडेकर यांच्या हस्ते फित कापून संपन्न झाला. यावेळी रत्नागिरी क्रेडाई माजी अध्यक्ष दीपक साळवी,शिवराज्याभिषेक समिती अध्यक्ष सुनील पवार, क्रेडाई सिंधुदुर्ग सचिव अभिजीत जैतापकर, खजिनदार अनिल साखळकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
क्रेडाई सिंधुदुर्ग अध्यक्ष गजानन कांदळगावकर यांनी प्रास्ताविक केले व प्रदर्शनाचे महत्व विषद केले..रसिक चौहान यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व मार्गदर्शन केले.श्री विदयानंद बेडेकर यांनी बिल्डर्सना येणाऱ्या विविध समस्या व त्याबत क्रेडाई महाराष्ट्र कडून करण्यात येणारे सहकार्य विषद केले. त्याचबरोबर विविध ट्रेनिंग्स घेण्याचे देखील आश्वासन दिले.यावेळी प्रकाश जैतापकर, विजय प्रभू, जीवन रेगे, अमोल शिरसाट,संकेत महाडिक, शेखर मोर्वेकर,उद्धव साखळकर,कुंदन केसरकर, तन्मय माळगावकर, सिद्धेश नाईक, सुशील आळवे, निलेश मांजरेकर आदी उपस्थित होते. अभय वालावलकर यांनी सूत्रसंचालन केले तर जीवन रेगे यांनी आभार मानले.
या वास्तूप्रदर्शनात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून एकूण 40 बिल्डर्स वि डेव्हलपर्स सामील झाले होते. यामध्ये एन ए प्लॉटपासून फ्लॅट, रो हाऊस, बंगले,दुकानगाळे हे सर्व विक्रीला होते.मुंबईकर चाकरमाण्यांचा या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तीन दिवसात सुमारे 5000 लोकांनी उपस्थिती दर्शविली. या वास्तूप्रदर्शनात सुमारे 75 प्लॉट्स व फ्लॅट्स चे स्पॉट बुकिंग झाले.तीन दिवसात अनेक मान्यवरांनी या वास्तूप्रदर्शनाला भेट दिली. रविवारी 6 एप्रिल रोजी कोकण प्रॉपर्टीजचा समारोप करण्यात आला.हे वास्तू प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडाई सिंधुदुर्गचे सचिव अभिजित जैतापकर व खजिनदार अनिल साखळकर यांनी विशेष मेहनत घेतली.