खारेपाटण येथे १० एप्रिल रोजी खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त
मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रिय मंत्री व विद्यमान भाजप खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त दी.१० एप्रिल २०२५ रोजी खारेपाटण येथे माजी सरपंच तथा भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमाकांत राऊत यांच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी शिबिर व २०० रुग्णांना मोफत चश्मा वाटप कार्यक्रम खारेपाटण एस टी बस स्थानक शेजारी कोळसुलकर कॉम्प्लेक्स येथे स.१०.०० ते दु. २.३० या वेळात घेण्यात येणार असल्याची माहिती शिबिराचे आयोजक रमाकांत राऊत यानी प्रसिदधीपत्रकाद्वारे दिली.
या मोफत नेत्र तपासणी शिबिराकरिता भारतीय जनता पार्टी आणि स्वामी विवेकानंद नेत्र रुग्णालय कणकवली तसेच आश्रय चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व सकल मराठा समाज बांधव खारेपाटण पंचक्रोशी यांचे सहकार्य लाभणार असून या शिबिराची वैशिष्ट्ये म्हणजे मोफत मोतीबिंदू तपासणी,मशिनद्वारे चश्मा तपासणी तसेच सवलतीच्या दरात मशिनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करन्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक श्री रमाकांत राऊत यांनी केले आहे.