वैभववाडीत ३४ ग्रा. पं. च्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

१८ ग्रा. पं वर असणार महीलाराज

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील ३४ग्रामपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीतील सरपंच पदाचे आरक्षण आज (ता.८) जाहीर झाले.यामध्ये १८ग्रामपंचायतींवर महीलाराज असणार आहे.आजच्या आरक्षणामुळे अनेक गावांमधील दिग्गज इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण तहसीलदार सुर्यकांत पाटील यांनी जाहीर केले.तहसीलकार्यालयाच्या सभागृहात चिठ्ठीद्वारे ही सोडत पद्धत पार पडली . यावेळी सुधीर नकाशे, भालचंद्र साठे, प्रमोद रावराणे,नासीर काझी, मंगेश लोके, अरविंद रावराणे, दिगंबर मांजरेकर यासह तालुक्यातील विविध गावांतील सरपंच व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.आरक्षण सोडतीच्या सुरवातीला अनुसूचित जातीसाठी तीन ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या.यामध्ये भुईबावडा,सडुरे -शिराळे दोन महीलांसाठी व भुईबावडा ही सर्वसाधारणसाठी आरक्षित करण्यात आली.त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ९ चिठ्या काढण्यात आल्या. यामध्ये ५महीला व ४सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या.त्यामध्ये मांगवली, कुसूर,तिरवडे तर्फ खारेपाटण, आखवणे-भोम,एडगाव-वायंबोशी या ग्रामपंचायतीवर महीला तर सोनाळी,सांगुळवाडी,करुळ, कोळपे या नामाप्र सर्वसाधारणासाठी आरक्षित झाल्या.शेवटला राहीलेल्या २२ग्रामपंचायती या सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या.यामध्ये ११ ग्रामपंचायती महीला व ११ठिकाणी सर्वसाधारण आरक्षण जाहीर करण्यात आले.यामध्ये तिरवडे तर्फ सौंदळ,गडमठ,मौदे,नेर्ले,नापणे,आचिर्णे,नाधवडे,लोरे नं २,कुंभवडे,कोकिसरे,निमअरुळे याठिकाणी महीला व नानिवडे,
उंबर्डे,कुर्ली,वेंगसर,तिथवली,हेत,नावळे,खांबाळे,अरुळेऐनारी,उपळे या ग्रामपंचायतीवर सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या.या आरक्षण सोडतीत गौरव संतोष काळे या लहान मुलाने या सर्व चिठ्ठ्या उचलल्या होत्या.तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायतीचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूचित जाती महिला
भुईबावडा
सडुरे शिराळे
जांभवडे(सर्वसाधारण), नागरिकांचा मागास प्रवर्ग
महीला: मांगवली, कुसूर,
तिरवडे तर्फ खारेपाटण, आखवणे-भोम,एडगाव-वायंबोशी ,
ना.मा.प्र.(सर्वसाधारण):
सोनाळी,सांगुळवाडी,
करुळ, कोळपे
सर्वसाधारण
महीला तिरवडे तर्फ सौंदळ,गडमठ,मौदे,
नेर्ले,नापणे,आचिर्णे,नाधवडे,लोरे नं २,कुंभवडे,
कोकिसरे,निमअरुळे
सर्वसाधारण(खुला) :नानिवडे,
उंबर्डे,कुर्ली,वेंगसर,तिथवली,
हेत,नावळे,खांबाळे,अरुळे:
ऐनारी,उपळे

error: Content is protected !!