परब को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईचे अध्यक्षपदी श्रीकृष्ण परब तर उपाध्यक्षपदी अनिल परब यांची निवड

मसुरे (प्रतिनिधी) : परब को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईच्या अध्यक्षपदी मसुरे गावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक श्रीकृष्ण उर्फ दीपक परब आणि उपाध्यक्षपदी वेरली गावचे सुपुत्र अनिल गणपत परब यांची निवड एकमताने करण्यात आली.

यावेळी संचालक म्हणून सोमा मधुकर परब, शैलेंद्रकुमार पांडुरंग परब, प्रभाकर गणपत परब, महिला संचालक म्हणून प्रतीक्षा प्रमोद परब, राधिका श्रीकृष्ण परब यांची निवड करण्यात आली. यावेळी परब को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीकृष्ण उर्फ दीपक परब म्हणालेत परब को ऑफ क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेच्या माध्यमातून सर्व संस्था सभासदांच्या हिताचा विचार करून लोकाभिमुख कारभार केला जाईल विविध बँकिंग संदर्भातील योजना तसेच या क्रेडिट सोसायटीला जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचाही भविष्यात आपला प्रयत्न राहील. या क्रेडिट सोसायटीची भांडुप, कुडाळ, कणकवली, वेंगुर्ला येथे अद्यावत अशा शाखा असून भविष्यात मालवण येथेही शाखा लवकरच सुरू करण्यात येणार असून परब ज्ञाती बांधवांसहित इतर ज्ञाती बांधवांनी सुद्धा या क्रेडिट सोसायटीचे सभासद होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवीन होतकरू उद्योजकांनाही उभे करण्यासाठी या क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येणार आहे. श्रीकृष्ण परब हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे उपाध्यक्ष ही असून विविध संस्थांवरती अध्यक्ष म्हणून कार्यरत सामाजिक कला क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे.उद्योजक श्रीकृष्ण उर्फ दीपक परब आणि उपाध्यक्ष अनिल परब यांचे सिंधुदुर्ग जिल्हा सहित मुंबईमध्ये ही अभिनंदन होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अध्यासी अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्था जी एन विभाग मुंबईचे विजयसिंह गवळी यांनी काम पाहिले.

error: Content is protected !!