ॲड. अक्षय चिंदरकर यांचा यशस्वी युक्तिवाद
मात्र सुरक्षित अनामत ७ लाखाची रक्कम भरणा न केल्यामुळे स्वप्नीलचा जेल मुक्काम वाढला
कणकवली (प्रतिनिधी) : १० टक्के व्याजदराने शेअर मार्केट मध्ये गुंतवलेल्या रक्कमेवर रिटर्न देण्याचे आमिष दाखवून सर्वेश हरी भिसे याची आर्थिक फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी स्वप्निल शांताराम बेळेकर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर त्याचा सशर्त जामीन कुडाळ न्यायाधीश जी . ए.कुलकर्णी यांनी मंजूर केला. आरोपी बेळेकर च्या वतीने ॲड.अक्षय चिंदरकर यांनी यशस्वी युक्तिवाद केला. आरोपी स्वप्निल बेळेकर व त्याची पत्नी विनया बेळेकर यांनी शेअर मार्केट मध्ये १० टक्के व्याजदराने रिटर्न मिळवून देण्याचे आमिष दाखवत सर्वेश भिसे यांची ७ लाख २३ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद कणकवली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्यात आरोपी स्वप्निल बेळेकर याला अटक करण्यात आली होती. त्याला ५ दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान आरोपी ची पोलिस कोठडी ची मुदत संपल्यानंतर त्याला ११ एप्रिल रोजी कुडाळ न्यायालयात हजर करण्यात आले. तपासी अधिकारी अनिल हाडळ यांच्यावतीने सरकारी वकिलांनी आरोपी स्वप्निल व त्याची पत्नी विनया यांच्याविरोधात आर्थिक फसवणुकी च्या आणखी तक्रारी दाखल झाल्या आहेत, तसेच आरोपी ची पत्नी सहआरोपी विनया हिचा ठावठिकाणा लागला नसून आरोपीने तपासकात सहकार्य केलेले नाही, आरोपीकडून फसवणूक केलेली रक्कम हस्तगत करायची असून वाढीव पोलिस कोठडीची मागणी केली. मात्र त्याला आरोपीचे वकील अक्षय चिंदरकर यांनी हरकत घेत याआधीच ५ दिवस सुनावण्यात आलेली पोलिस कोठडी पोलिस तपासासाठी पुरेशी असून वाढीव पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचे नमूद केले. ॲड अक्षय चिंदरकर यांच्या युक्तिवादानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आरोपीची जामीनावर मुक्तता होण्यासाठी दाखल अर्जावर निर्णय देताना कुडाळ न्यायाधीशांनी ३ लाख रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला. तसेच गुन्हा आर्थिक फसवणुकी चा असल्यामुळे सुरक्षा अनामत रक्कम म्हणून ७ लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिला. मात्र ७ लाख रुपयांची अनामत रक्कम जमा करू न शकल्यामुळे जामीन मंजूर होऊनही आरोपी स्वप्निल चा जेल मुक्काम वाढला आहे