कणकवली (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने कणकवली येथील बौध्द विहार येथे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. अबिद नाईक यांनी बुद्ध विहार येथे बोलताना डॉ. बाबासाहेबांन सारखे युगपुरुष अनेक शतकात एकदाच जन्माला येतात आणि पुढील अनेक शतकासाठी प्रेरणा देऊन जातात अनेक प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन त्यांनी मानवी हक्क, समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांवर आधारित भारतीय संविधान निर्माण केले डॉ. बाबासाहेबांचे विचार कुठल्या एका जातीच्या धर्माच्या, पंथाच्या, प्रांताच्या कल्याणासाठी नव्हते अखिल मानव जातीच्या कल्याणाची ताकद त्यांच्या विचारांमधे आहे आजच्या या महत्वपूर्ण दिवशी आपण संविधानाच्या मूल्यांचा पुन्हा एकदा संकल्प करूया समाज परिवर्तन , सामाजिक समता, आणि बंधुभावाची जोपासना करण्याचा निश्चय करूया असे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डॉ. बाबासाहेबांचे विचार जतन करण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही नाईक म्हणाले.
यावेळी बुद्ध विहार चे अध्यक्ष अंकुश कदम, उपाध्यक्ष परशुराम कदम, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर,तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर्,शहर अध्यक्ष इम्रान शेख, उपाध्यक्ष गणेश चौगुले, युवक तालुका अध्यक्ष निशिकांत कडुलकर, जिल्हा सचिव सतीश पाताडे, शहर सरचिटणीस सचिन अडुळकर, तालुका खजिनदार राजू वर्दम,तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पिसे, सत्य विजय परब, तालुका चिटणीस मुश्ताक काझी,तालुका प्रतिनिधी सईद काझी,सलीम शेमना,अली नाईक, उदय सावंत, जाहीर फकीर, बाळू मेस्त्री, पदवीधर सेल मतदारसंघ अध्यक्ष महेश चव्हाण युवक जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस,बाबा साळवी उपस्थित होते.



