हजारोच्या संख्येने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा” सुरू

भाजपा आ.नितेश राणेंच्या उपस्थितीत सुरुवात

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पटकी देवी मंदिर येथून काही वळेता “स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला” आमदार नितेश राणे यांच्या नेतत्वाखालील सुरूवात झाली. हजारोच्या संख्येने सावरकर प्रेमी यात्रसाठी दाखल झाले आहेत. तर रत्नागिरी येथील शिवरूद्र ढोल पथकाने शानदार सलामी दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन चरित्रातील देखावे या यात्रेत दाखण्यात आले आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे आणि सेना भाजपा युतीचे मतदार संघातील सर्व नेते, पदाधिकारी या यात्रेत मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. मोठ्या उत्साहात ही यात्रा छत्रपती शिवाजमहाराजांच्या चौकात दाखल होण्यासाठी रवाना झाली आहे. यावेळी जय श्रीराम, मी सावरकर चा घोषणा आणि टोप्या, शाली प्रत्येकाने घातल्या होत्या.

error: Content is protected !!