सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : 11 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मालवण राजकोट येथील शिवपुतळ्याचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले असणार आहेत.राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मुख्यमंत्री फडणवीस आरती करणार आहेत. राजकोट किल्ल्यानजीक सिंधुरत्न समिती अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेनुसार शिवसृष्टी उभारली जाणार आहे. राजकोट किल्ला भेटीनंतर मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्र राजे भोसले करंजे येथील गोवर्धन गोशाळेच्या उदघाटन साठी उपस्थित राहणार असल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
राजकोट मधील शिवपुतळ्याकडे मुख्यमंत्री फडणवीस करणार आरती












