पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके व नुतन कार्यकारिणीचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केला सत्कार
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके व नुतन कार्यकारिणीचा पालकमंत्री नितेश राणे यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. पत्रकार संघ म्हणून आगामी काळात चांगले काम करा , अशा शुभेच्छा व्यक्त केल्या . तसेच कणकवली पत्रकार संघाने प्रेस क्लबसाठी प्रस्ताव दिल्यास ते काम मार्गी लावले जाईल , असा विश्वास या भेटीदरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी गणेश जेठे , जिल्हा उपाध्यक्ष संतोष राऊळ , सचिव संजय सावंत , खजिनदार रोशन तांबे , माजी तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई , अजित सावंत , उपाध्यक्ष उमेश बुचडे , विरेंद्र चिंदरकर , तुषार हजारे , संजय बाणे , विजय गांवकर आदींसह पत्रकार उपस्थित होते.












