धरणग्रस्तांकडून पालकमंत्र्यांचे आभार
वैभववाडी (प्रतिनिधी) : आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावाठाणाला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा प्राप्त झाला आहे. ६ मे रोजी शासनाने याबाबतचा आध्यादेश काढला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नाने गावठाणाला ग्रामपंचायत दर्जा मिळाल्यामुळे आखवणे भोम पुनर्वसन गावठाणतील ग्रामस्थांकडून पालकमंत्र्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
अरुणा मध्यम पाटबंधारे धरण प्रकल्पात आखवणे, भोम हे दोन गाव बुडीत क्षेत्रात गेले. यातील धरणग्रस्थासाठी मांगवली, उंबर्डे, कुसूर येथे पुनर्वसन गावठाण तयार करण्यात आले. याठिकाणी २०१९ साली धरणग्रस्थांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. तेव्हा पासून पुनर्वसन गावठाणा स्वतंत्र ग्रामपंचायत देण्यात यावी यासाठी धरणग्रस्थाकडून प्रयत्न करण्यात येत होते. यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी शासन स्तरावर विशेष प्रयत्न केले.
गावठाणाला स्वतंत्र महसूली गावाचा दर्जा मिळाल्यामुळे पुनर्वसन गावठाणाला खऱ्या अर्थाने गावपण प्राप्त झाले आहे. सध्या हे पुनर्वसन गावठाण पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येत. त्यामुळे गावाठाणातील स्थावर मालमत्ता अदयाप संबंधित मालमता धारकांच्या नावावर नोंद झालेली नाही. त्यामुळे अनेक अडचणीना धरणग्रस्थाना तोंड दयावे लागत होते. महसुली गाव झाल्यामुळे पुनर्वसन गावठाणतील प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
महसुली गावाचा दर्जा मिळाल्याचा अध्यादेस मिळताच पुनर्वसन गावठाणतील धरणग्रस्थाकडून फाटक्या फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच पालकमंत्री नितेश राणे यांचे पुनर्वसन गावठाण येथे स्वागत व आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, महिला अध्यक्ष प्राची तावडे माजी सभापती अरविंद रावराणे, दिगंबर मांजरेकर, राजेंद्र राणे,पुनर्वसन गावठाणतील माजी सरपंच आर्या कांबळे, डॉ जगन्नाथ जामदार, दत्ताराम बुवा नागप,अभय कांबळे, संतोष सुतार, सुरेश पांचाळ, संतोष नागप, भाई शेलार, संतोष कदम, बबन जाधव, श्री तळेकर, मोहन सुतार, यांच्यासह पुनर्वसन गावठाणातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.












