वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात सह्याद्री पट्ट्यातील गावात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास जोरदार सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली. सध्या लग्नसराई व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असून अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचे धावपळ त्याचप्रमाणे वादळी वारे व पावसामुळे काढणीस आलेल्या आंब्याचे नुकसान झाले आहे.तर अंतिम टप्यात असलेल्या आंबा, काजू पिकाला ही फटका बसला आहे.मात्र या पावसाने उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यात गेले काही दिवस उष्णतेत कमालीची वाढ झाली होती. मात्र गेले तीन-चार दिवस काहीसे ढगाळ वातावरण होते. दुपारी दोनच्या सुमारास जोरदार पावसाने झोडपून काढले. तालुक्यातील कुसर, कुंभवडे, करूळ, नावळे, खांबाळे सांगुळवाडी सडूरे अरुळे वैभववाडी शहर परिसर सह अन्य गावात पावसाने हजेरी लावली.
वैभववाडी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस












