आदर्श विद्यामंदीर सावडावचा निकाल १०० टक्के

रिया नरसाळे 91.20 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

कणकवली (प्रतिनिधी) : माध्यमिक शालांत परीक्षेत आदर्श विद्यामंदीर ,सावडावचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यालयातून कु. रिया भालचंद्र नरसाळे हिने 91.20 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला.

त्याबरोबर व्दितीय क्रमांक दीव्या जयवंत डगरे हिने 86.89 तर तृतीय क्रमांक कु.श्रेया दशरथ बिर्जे हिने80.40 टक्के गुण मिळविले. विद्यालयातून एकूण 20 विद्यार्थी प्रविष्ट होत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत १०० टक्के निकाल लागला आहे. उत्तीर्ण सर्व विद्यार्थाचे मुख्याध्यापक रविंद्र सावंत, संस्था पदाधिकारी,सभासद, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यानी अभिनंदन केले.

error: Content is protected !!