१००% निकालाची यशस्वी परंपरा कायम
चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे चा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२५ ( एस. एस. सी. ) चा निकाल १००% टक्के लागला आहे. काळसे हायस्कूल मधून एस. एस. सी. परीक्षेसाठी एकूण ३० विद्यार्थी बसले होते ते सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधून कुमारी प्रीती संजय कदम ही ९५% गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे तर कुमारी अनुष्का सतीश माडये हिने ९२.२०% गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. त्याचप्रमाणे कुमारी मयुरी आनंद खोत हिने ९२% टक्के गुण प्राप्त करून प्रशालेमध्ये तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. अशाप्रकारे काळसे हायस्कूलने आपली १००% निकालाची यशस्वी परंपरा या वर्षीही कायम राखली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनोद गोसावी, उपाध्यक्ष योगेश राऊळ, सचिव अनंत परब, सहसचिव शरद गोसावी, खजिनदार जयवंत केळुसकर तसेच सर्व संचालक आणि मुख्याध्यापक अविनाश परब यांनी अभिनंदन केले आहे.

प्रीती संजय कदम

अनुष्का सतीश माडये

मयुरी आनंद खोत












