ऍड. चैतन्य परब यांचा यशस्वी युक्तिवाद
कुडाळ (प्रतिनिधी) : हयगयीने एम जी हेक्टर कार चालवून अपघातग्रस्त दुचाकी स्वाराच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याच्या दोषारोपातून प्रणव जयंत यादव ( रा. नाचणे, रत्नागिरी ) याची कुडाळ न्यायाधीशांनी निर्दोष मुक्तता केली आहे. ऍड चैतन्य परब यांनी प्रणव यादव च्या बाजूने यशस्वी युक्तिवाद केला. 21 ऑगस्ट 2023 रोजी पावशी येथे प्रणव यादव च्या ताब्यातील एम जी हेक्टर कार ची धडक बसून दुचाकीस्वार अरुण शंकर घारे या 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. तसेच दत्ताराम पावसकर हे जखमी झाले होते. या घटनेत एम जी हेक्टर चालक प्रणव यादव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला कुडाळ येथील न्यायालयात चालला. या खटल्यात आरोपीच्या वतीने ऍड. चैतन्य परब यांनी केलेल्या यशस्वी युक्तिवादानंतर आरोपी प्रणव यादव याची कुडाळ न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.












