स्वर्गिय आर आर पाटील सुंदर गाव योजनेत तरंदळे ग्रामपंचायतीचा प्रथम क्रमांक

तरंदळे ग्रामस्थांच्यावतीने ग्रामपंचायतीचा करण्यात येणार सन्मान

कणकवली (प्रतिनिधी) : स्वर्गीय आर्. आर्. पाटील सुंदर गाव योजनेत कणकवली तालुक्यातील तरंदळे ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 433 ग्रामपंचायती मधुन हे यश प्राप्त झाले आहे. मिळालेले हे यश गावच्या विकासासाठी नक्कीच भुषणावह आहे.मिळालेल्या या यशात सरपंच सुशील कदम व ग्रामपंचायत सदस्य तसेच तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर सावंत आणि त्यांची टीमचा यशात महत्वाचा सहभाग आहे. येणार्या काही दिवसात तरंदळे गावाचे नाव जिल्ह्यात झळकल्याबद्दल तरंदळे गावातील अनंत विनायक सावंत,अमित सावंत व ग्रामस्थांच्यावतीने तरंदळे सरपंच, ग्रामसेवक आणि सर्व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!