विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे फोंडाघाटचे आराध्य श्री देव राधाकृष्ण मंदिर चा वर्धापन दिन, गुरुवार दिनांक २२ मे २५ रोजी संपन्न होणार आहे. सकाळी नऊ वाजता लघुरुद्र, दहा वाजता श्री सत्यनारायण महापूजा,त्यानंतर आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद ! सायंकाळी सात वाजता हरिपाठ, रात्र आठ वाजता श्री लिंगेश्वर पावणाई प्रासादिक,दिंडी वारकरी भजन मंडळ – वाघेरी यांचे बहारदार भजन असे कार्यक्रम आयोजित केले आहेत.तरी त्या कार्यक्रमाचा भाविकांनी व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन बालगोपाळ मंडळातर्फे करण्यात आले आहे.












