सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिमाका महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण झाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आरती देसाई, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, तहसिलदार चैताली सावंत यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
















