काळसे श्री देव लिंगेश्वर मंदिर वर्धापन दिन सोहळा २० मे रोजी

विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

चौके (प्रतिनिधी) : काळसे येथील श्री देव लिंगेश्वर मंदिराच्या ११ व्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन मंगळवार दिनांक २० मे रोजी करण्यात आले आहे. या निमित्ताने सकाळी ८ वाजता होम हवन, दुपारी १२.१५ वाजता महाआरती, दुपारी १.०० ते ३.०० महाप्रसाद, दुपारी ३.०० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायं. ५.०० वाजता आरती – तीर्थप्रसाद, स्थानिक भजन, सायं ७.०० ते ९.०० विविध भजन मंडळांची भजने, आणि रात्रौ ९.०० वाजता “दुरीतांचे तिमिर जावो” हे बाळ कोल्हटकर लिखित ३ अंकी संगीत नाटक आयोजित करण्यात आले आहे. तरी गावातील सर्व रहिवाशांनी आणि भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव रवळनाथ, श्रीदेव लिंगेश्वर देवालय ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!