देवगड (प्रतिनिधी) : ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यदलाचे चे मनोबल वाढवण्यासाठी पड़ेल मंडल मध्ये आमदार विजय (भाई) गिरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली तिरंगा यात्रा मोटरसायकल व इतर गाड्या व पोलीस वाहन समवेत 1८ मे रोजी पड़ेल ते गिर्ये रामेश्वर अशी काढण्यात आली. या वेळी भारतमाता की जय च्या घोषणानी संपूर्ण परिसर दुमदुमला विजय (भाई) गिरकर यांनी सर्वांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला…या वेळी पड़ेल मंडल अध्यक्ष महेश (बंड्या) नारकर, आरिफशेठ बगदादी, संजय बोंबडी, रवि पाळेकर, रवि तिरलोटकर, पडेल सरपंच भुषण पोकळे, संजना आळवे, गिर्ये सरपंच लता गिरकर, रामकृष्ण जुवाटकर, अंकुश ठुकरुल, वाडा सरपंच सुनील जाधव, उपसरपंच विष्णु राणे, अजित मुळम, विकास देवळेकर, मूर्गेश राणे विजयदुर्ग पोलीस स्थानकाचे सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद तसेच असंख देश प्रेमी नागरिक उपस्थित होते.
पडेल मध्ये तिरंगा रॅली; ऑपरेशन सिंदूर च्या पार्श्वभूमीवर केला जयघोष












