राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती उस्तव भाजपाच्या वतीने साजरा होणार

प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई जिल्हा संयोजक – राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी कार्यक्रम

बुधवार दिनांक २१ मे रोजी भाजपा सिंधुदुर्ग ची त्रिशताब्दी जयंती उस्तव आयोजन करण्यासंदर्भात ” जिल्हा कार्यशाळा “

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती उस्तव संपुर्ण महाराष्ट्रात २१ मे ते ३१ मे या कालावधीत साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासंदर्भात भाजपा सिंधुदुर्ग ची ” जिल्हा कार्यशाळा ” बुधवार दिनांक २१ मे रोजी सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग नगरी येथील वसंत स्मृती सभागृहात महीला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा व ठाणे – कोकण विभागाच्या अभियानाच्या प्रमुख प्रा.वर्षा भोसले – माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपंन्न होणार आहे.

या कार्यशाळेसाठी भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कार्यकारणी सदस्य, मोर्चा / आघाडी प्रदेश पदाधिकारी व प्रदेश कार्यकारणी सदस्य , जिल्हा पदाधिकारी, जिल्हा व मंडल समिती ( राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंती समारोह ), जिल्हा मोर्चा अध्यक्ष व सरचिटनीस, आघाडी / प्रकोष्ठ जिल्हा संयोजक, मंडल अध्यक्ष ( आजी / माजी ), सर्व लोकप्रतिनिधी अपेक्षीत आहेत. तरी सर्व अपेक्षीतांनी उपस्थित रहाणे अनिवार्य आहे.

सिंथुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेशजी राणे व जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी उस्तव विवीध उपक्रम आयोजीत करुन साजरा करणार असे या अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी सांगीतले.

error: Content is protected !!