आचरा (प्रतिनिधी) : अवकाळी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे. आचरा पंचक्रोशीतील त्रिंबक येथील साटमवाडी बांबरवाडीला जोडणा-या कॉजवेला यांचा फटका बसला असून कॉजवेचा काही भाग खचून पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे. त्यामुळे बांबरवाडीचा वाहतूकीचा संपर्क तुटला असून या बाबत ग्रामपंचायत प्रशासन तसेच कॉजवे बांधकाम विभागशी संबंधित आहे व वरीष्ठ पातळीवर संपर्क करुन तात्काळ उपाययोजना करण्याची विनंती आपण केली असल्याची माहिती माजी सरपंच शेखर सुतार यांनी दिली आहे.
त्रिंबक साटमवाडी बांबरवाडीला जोडणारा कॉजवे गेला वाहून…!












