पत्नी बेपत्ता; पतीची पोलिसांत धाव, शोध मोहीम सुरू

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ गावातील बिडयेवाडी येथील मनोरमा अपार्टमेंट राहणाऱ्या महिलेच्या बेपत्ता होण्याची घटना समोर आली असून, पतीने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.प्रशांत जयंंत रसाळ (वय ३९) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी अंकिता प्रशांत रसाळ (वय ३६) या १९ एप्रिल २०२६ रोजी पती प्रशांत सोबत झालेल्या भांडणाच्या रागातून सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या. मात्र त्यानंतर त्या परत न आल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. नातेवाईक व परिचितांकडे चौकशी करूनही काहीही माहिती न मिळाल्याने अखेर पोलिसांत धाव घेण्यात आली.
बेपत्ता झालेल्या महिलेचा मोबाईल क्रमांक संपर्काबाहेर असून, त्या घरातून निघताना यामाहा पसिनो स्कुटर ( MH ०८ – २६८० ) घेऊन कोणालाही काही न सांगता गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

महिलेचे वर्णन असे: गोरा रंग, उंची अंदाजे ५ फूट ४ इंच, बांधा मध्यम, केस काळे व लांब. अंगावर गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केलेला होता.
या प्रकरणी पोलिसांनी बेपत्ता नोंद करून शोध मोहीम सुरू केली असून, संबंधित महिलेबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!