नियमित पाणीपुरवठा करण्याचे मांगवली ग्रामपंचायत चे लेखी आश्वासन
वैभववाडी (प्रतिनिधी) : ग्रामपंचायतने नियमित पाणीपुरवठा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मांगवली बौद्धवाडी येथील ज्येष्ठ नागरिक वासुदेव जुवाटकर यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
मांगवली सरपंच व व नळ पाणीपुरवठा करणारा कामगार हे सूडबुद्धीने पाणी कपात करून अपुरा पाणीपुरवठा करून आपला मानसिक छळ करीत आहेत असा आरोप करीत या विरोधात गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालय मागवली समोर जुवाटकर यांनी भर उपोषण सुरू केले होते.
उपोषणाची दखल घेत गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, विस्तार अधिकारी लक्ष्मण हांडे मांगवली सरपंच नाटेकर,ग्रामपंचायत सदस्य यांनी जुवाटकर यांच्याशी चर्चा केली. २६ मे पासून ज्याप्रमाणे नियमित पाणी पुरवठा केला जात आहे तसाच तो पुढे नियमित चालू राहील. तसेच वाडीतील पायवाटेची दुरुस्ती करण्यात येईल. असे लेखी आश्वासन ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच व ग्रामसेवकांनी दिले. त्यानंतर गटविकास अधिकारी जंगले यांच्या हस्ते पाणी घेऊन वाटकर यांनी आपले उपोषण मागे घेतले.












