पुण्यशोल्क अहिल्याबाई होळकर यांची जयंती तरंदळे ग्रामपंचायत मध्ये साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : पुपुण्यशोल्क अहिल्याबाई होळकर यांची जयंती तरंदळे ग्रामपंचायत मध्ये साजरी करण्यात आली.ह्यावेळी गावातील 2 कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला. वनिता विशाल कदम ह्यांनी बचत गट महिलांचे स्थापन करून त्यांना उद्योजक करण्यात महत्वाचा वाटा उचलला, बांधकाम कामगार,तसेच शासकीय योजना ची माहिती,परिपूर्ण सेवा देण्यात लोकांना देण्यात त्या अग्रेसर असतात. यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले. सौ.दीपाली दिलीप सामंत यांनी गावातील महिलाना लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरून देणे,कागद पत्रांची पूर्तता करणे.लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाचे उल्लेखनीय काम केले,तसेच सामाजिक कार्य क्षेत्रात त्या अग्रेसर असतात.त्यामुळे त्यांना अहिल्या बाई पुरस्कार सरपंच सुशिल कदम यांच्या हस्ते देण्यात आले.ह्यावेळी सरपंच सुशिल कदम,ग्रामपंचायत अधिकारी मनस्वी माळकर,तंटा मुक्ती अध्यक्ष सन्माननीय सुधीर सावंत, अभय सावंत,वनिता कदम,उपस्थित होते.

error: Content is protected !!