शिक्षक भारती सिंधुदुर्गचे शिक्षण संचालकांना निवेदन
तळेरे (प्रतिनिधी) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्या नियोजनानुसार निवड व वरिष्ठ श्रेणी राज्यात सुरू आहेत. गेल्या सहा दिवसाचे सत्र पाहता राज्यातील प्रशिक्षणार्थी शिक्षक परेशान झालेले दिसून येत आहेत. आपण प्रशिक्षणाची वेळ 9:15 ते 5:30 ठेवण्यात आल्याची दिसून येत आहे. प्रशिक्षणाची वेळ ही ग्रामीण भागातील शिक्षकांचा विचार करून ठेवण्यात आलेली दिसून येत नाही. पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक प्रशिक्षणास्थळी ५ मिनिटे उशिरा पोहचले त्यामुळे त्यांची ऑनलाइन उपस्थिती लागू शकली नाही.
तसेच रविवार दिनांक 8 जून 2025 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात निवळी या ठिकाणी ऑनलाइन हजेरीच्या कारणामुळे शिक्षकांना नाहक अपघाताला सामोरे जावे लागले आहे त्यामुळे शिक्षकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ही बाब गंभीर असून ऑनलाईन हजेरी रद्द व्हावी. तसेच सर्व गोष्टीचा विचार करता प्रशिक्षणाची वेळ 10 ते 5 असादी प्रशिक्षणार्थी शिक्षकांची ऑनलाइन परीक्षा न घेता ऑफलाइन परीक्षा घ्यावी.
अशा प्रकारचं शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्गचे प्राचार्य कांबळे सर यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिक्षक भारती महाराष्ट्र राज्याचे प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर, जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य सन्माननीय विठोबा कडव, राज्य कार्यकारणी सदस्य चंद्रकांत चव्हाण, स्वप्निल पाटील, दत्तात्रय मारकड, वैभव कोंडसकर, तोरस्कर सर, पिंटो मॅडम, तसेच वरिष्ठ व निवड श्रेणीचे इतर प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.