चौके (प्रतिनिधी) : काळसे बागवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर सहदेव कोरगावकर ऊर्फ सुधाकर कोरगावकर वय ( 78) यांचे शुक्रवार 6 जून रोजी सायंकाळी अल्पशा आजराने उपचारादरम्यान निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सून जावई नातंवंडे असा परीवार आहे.
काळसे ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे काम केले होते तसेच उत्कृष्ट भजनी बुवा,काळसे गावातील पहिले वाळू व्यावसायिक तसेच कलाप्रेमी होते बैल झुंजिची आवड असलेले व्यक्तीमत्व अशी त्यांची ख्याती होती. प्रेमळ स्वभावामुळे समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग होता. काळसे गावातील वाळू व्यावसायिक श्री. ललीत कोरगावकर यांचे वडील होते.