पणजी गोवा येथे चोराला केले चतुर्भुज
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कणकवली शहरातील कनकनगर येथील समृद्धी कोरगावकर यांच्या घरफोडीचा छडा एलसीबी सिंधुदुर्ग आणि कणकवली पोलीस स्थानकाच्या पोलीस पथकाने लावला असून अवघ्या 16 तासांत चोराला गजाआड करतानाच साडेसहा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व अन्य ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. संतोष क
वसंत सुतार ( वय 48, रा. संगमेश्वर रत्नागिरी ) असे चोरट्याचे नाव आहे सदर कारवाई एसपी डॉ डॉ दहिकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले ,डीवायएसपी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी मारुती जगताप यांच्या सूचनेनुसार कणकवली पोलीस ठाण्याचे पीएसआय अनिल हाडळ,एलसीबी पीएसआय रामचंद्र शेळके, एलसीबी पीएसआय समीर भोसले, हवालदार पांडुरंग पांढरे, हवालदार डॉमनिक डिसोझा, हवालदार जॅक्सन घोंसालवीस, हवालदार आशिष जामदार यांच्या पथकाने फत्ते केली. कणकवली शहरातील कनकनगर येथील परिचारिका समृद्धी मिलिंद कोरगावकर ह्या शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवार 7 जून रोजी नाईट ड्युटीसाठी गेल्या होत्या. तर त्यांचे पती मिलिंद हे आपल्या वडील आणि मुलासोबत आपल्या मालवण येथील बहिणीकडे गेले होते. रविवारी 8 जून रोजी सकाळी पावणे नऊ वाजता ड्युटीवरून परत आल्यानंतर समृद्धी कोरगावकर याना आपल्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी झालेली दिसली. चोरट्याने साडेतीन लाखांचा ऐवज चोरल्याची फिर्याद समृद्धी कोरगावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. यव चोरीचा छडा लावण्यासाठी एलसीबी सिंधुदुर्ग आणि कणकवली पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक चोरट्याच्या मागावर होते. मानवी कौशल्य आणि पणजी शहरात पायी गस्त घालून अवघ्या 16 तासांत चोरट्याच्या मुसक्या एलसीबी सिंधुदुर्ग आणि कणकवली पोलिसांनी आवळल्या आहेत.