कणकवली (प्रतिनिधी) : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 11 वर्षांच्या यशस्वी कारकीर्द संकल्प ते सिद्धी या मंत्राने कालखंड ओळखला जाणार आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जगात महासत्ता म्हणून वाटचाल करत आहे. 2014 पूर्वी युपीए 1 आणि 2 च्या काळात भ्रष्टाचारात जगातील महासत्ता म्हणून वाटचाल करत होता. 2014 नंतर भारताची प्रतिमा बदलली आहे. आज जगात भारताची दखल घेतल्याशिवाय एकही घटना घडत नाही. मोदींबद्दल जो आदर जगात व्यक्त होतो त्यावरून भारताची जगात असलेली ताकद समजून येते.जगात जपान च्या पूढे जाऊन भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक सत्ता झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देश जगातील महासत्ता बनेल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.देशाच्या दरडोई उत्पन्नात झालेली वाढ, जीडीपी मध्ये झालेली वाढ यातून भारताचा होत असलेला विकास दिसून येत आहे. ना खाऊंगा ना खाने डुंगा अशी घोषणा करत मोदी यांनी भ्रष्टाचाराला चाप लावला. भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मजबूत पाऊले पंतप्रधान मोदी यांनी उचलली.भारताकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याला जरब बसवली आहे. पाकिस्तान ला धडा शिकवला आहे. ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानसह चीन, बांगलादेश ला मोठा संदेश दिला आहे. नक्षलवाद ही भारताची दुखरी बाजू होती. नक्षलवाद संपण्यासाठी नक्षल मुक्त भारत ची घोषणा करून 90 टक्के नक्षलवाद आटोक्यात आणला आहे. केंद्र सरकार जेव्हा कुठलीही योजना जाहीर करवयचे तेव्हा त्याचा लाभ कधी मिळणार याची वाट बघावी लागे. मात्र पंतप्रधान मोदी यांनी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात योजनेचा निधी जमा करण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांना कोव्हीड काळातही शेतकरी सन्मान पेन्शन लाभ दिला. कोव्हिड काळात शेवटच्या घटकातील जनतेला मोफत धान्य दिले. उद्योग क्षेत्रात भारत मोठी झेप घेत आहे. फेसबुक ऍपल सारख्या कंपन्या आता भारतात आपले युनिट सुरू करत आहेत. प्रधाननमंत्री मत्स्य संपदा योजना, सागरमाला सारखी योजना, 25 हजार कोटींचा निधी बंदर विकासासाठी दिला. प्रत्येक भारतीयासाठी पंतप्रधान मोदींचा 11 वर्षांचा कार्यकाळ हा सुशासनाचा काळ आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देश जगातील नक्कीच आर्थिक महासत्ता बनेल असा विश्वासही पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवराज लखमराजे भोसले, मनोज रावराणे, श्वेता कोरगावकर, डॉ मिलिंद कुलकर्णी, संदीप मेस्त्री, नामदेव जाधव, मिलिंद मेस्त्री, समीर नलावडे, प्रियांका साळसकर आदी उपस्थित होते.















