महाराष्ट्र आयकॉनिक अवार्ड पुरस्काराने वृत्तपत्रकार रमेश जामसंडेकर सन्मानित

खारेपाटण (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित साधून स्काय इंटर नॅशनल टूरिझम व राजधानी नाविन्यपूर्ण सहकारी संस्था पाटण सातारा यांचे वतीने कर्मयोगी सन्मान कौतुक परिषद कराड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खारेपाटण गावचे सुपुत्र व वृत्तपत्र छायाचित्रकार रमेश जामसंडेकर यांचा पत्रकारी शेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला. या कौतुक सन्मान परिषदेमध्ये सपूर्ण महाराष्ट्राभर कौतुकास्पद कार्य करणाऱ्या कार्यवीरांनाचा राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात खारेपाटण ता. कणकवली या गावचे सुपुत्र तसेच वृत्तछायाचित्रकार रमेश जामसंडेकर यांचा महाराष्ट्र आयकॉनिक अवार्ड पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. वृत्तपत्र छायाचित्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना लक्ष्मीची पाऊले मालिकेतील अभिनेते राहूल व सातारा जिल्हा पालकमंत्री यांचे निकटवर्तीय देखमुख, जागतिक विश्व विक्रमवीर योगा ब्रॅण्ड ॲविसिहर डॉ. जान्हवी इंगळे, माजी आमदार आनंदवार पाटील, प्रा. बी. एन. खरात यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

हा पुरस्कार वितरण सोहळा वेणूबाई चव्हाण स्मारक सभागृह कराड या ठिकाणी पार पडला. तर या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्धअभिनेता लक्ष्मीची पाऊले मालिकेत राहुलची भूमिका साकारणारे ध्रुव दातार, सतीश भोसले शरद यादव सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!