वेंगुर्ला (प्रतिनिधी) : काल रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले मालवण सागरी महामार्गावरील दाभोली येथे मुख्य रस्त्यावर दरड कोसळली आहे. सुदैवाने यावेळी वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
ही दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सकाळ पर्यंत ठप्प झाली होती. वेंगुर्ले गुड मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून कोसळलेली दरड पहिली आणि सामाजिक बांधिलकी जपत एका बाजूने काही दगड बाजूला करून लहान गाड्यांसाठी रस्ता मोकळा केला. त्यांच्या कृतीचे अभिनंदन होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने संपूर्ण दरड बाजूला केली असून वाहतूक सुरळीत सुरु आहे















