कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण

कासार्डे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात कासार्डे विकास मंडळाचे अध्यक्ष मनोज शेलार याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळेस विविध प्रकारची झाडे लावण्यात आली.

यावेळी सरचिटणीस रोहिदास नकाशे, संस्था पदाधिकारी सुभाष पाताडे, दिलीप शेलार,लक्ष्मण पाताडे,प्रकाश तिर्लोटकर, बाबू नकाशे ,प्रभाकर नकाशे आदी उपस्थित होते. वृक्षारोपण प्रकाश तिर्लोटकर याच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असून वृक्ष ही काळाची गरज असून जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याचा मनोदय कासार्डे विकास मंडळाचा असल्याचा अध्यक्ष मनोज शेलार यानी सांगितले.

error: Content is protected !!