वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना वैभववाडी शाखेच्यावतीने वैभववाडी शहरातील सफाई कामगारांच्या मुलांना शालेय साहित्य व मिठाई देऊन साजरा करण्यात आला.
यावेळी मनसे कणकवली विधानसभा प्रमुख सचिन तावडे तालुकाध्यक्ष महेश कदम रुपेश वारंग आदी पदाधिकारी उपस्थित होते. राज ठाकरे यांचा वाढदिवस सगळीकडे साजरा केला जातो. यावेळी हा वाढदिवसाच्या निमित्ताने वाभावे वैभववाडीचे सफाई कामगार यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य, तसेच मिठाई वाटून साजरा करण्यात आला.












