डिगस मध्ये रस्त्यावर झाड कोसळून दुतर्फा वाहतूक ठप्प

कुडाळ पणदूर रस्ता ब्लॉक

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील कुडाळ पणदुर घोडगे राज्य मार्गावर डिगस प्राथमिक शाळा नंबर एक येथे भले मोठे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. दुर्गावाड घोडगे व पांग्रड येथून कुडाळ आगारात माघारी फिरणाऱ्या एसटी बसेस अडकल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने झाड हटवीण्याचे काम सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थशंकर देसाई, रुपेश जिवबा पवार, बंटी शिरोडकर, विनायक पालव आदी ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले असून झाड हटवीत आहेत. याबाबत आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती देण्यात आली असून प्रशासनाकडून अद्याप कोणीही दाखल झालेले नाही. यामुळे तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!