डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे दि. १८ जून रोजी दुपारी २ वाजता मेळाव्याचे आयोजन
उद्योग विभाग महाराष्ट्र शासन च्या जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्ग पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र(एम सी इ डी) सिंधुदुर्ग यांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन
वैभववाडी (प्रतिनिधी) : उद्योग विभाग महाराष्ट्र शासन च्या जिल्हा उद्योग केंद्र,सिंधुदुर्ग पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र(एम सी इ डी) सिंधुदुर्ग यांच्या वतीने अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीकरिता एकदिवसीय मोफत मेळाव्याचे दिनांक 18/06/2025 रोजी ठीक दुपारी 2.0 वा. आयोजन करण्यात येत आहे. स्वयंरोजगार/उद्योग करू इच्छिणाऱ्या 18 ते 50 वर्षे वयोगटातील व किमान सातवी पास इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत कर्ज व सबसिडी योजना, नियोजित मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आदी बाबत सर्वांना या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
युवा उद्योजक ॲड. विशाल जाधव – कोळपे
7021100842
सुषमा साखरे, कार्यक्रम समन्वयक, MCED,सिंधुदुर्ग
7774876139











