कोण गेलं – कोण आलं फरक पडत नाही, जनता आमच्या बरोबर : आमदार सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना, कोल्हापुरात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. मात्र अशा अनेक अडचणी या आधी माझ्या आयुष्यात आल्या, कोण गेलं कोण आलं याचा फरक पडत नाही, अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शाहू स्मारक भवनमध्ये वह्या वाटप कार्यक्रमासाठी आमदार सतेज पाटील आले होते.

या कार्यक्रमानंतर, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला सामान्य माणूस आमच्या सोबत आहे, तो पर्यंत काळजी नाही. पक्ष फोडाफोडी आणि कार्यकर्त्यांची फोडाफोडी हे प्रसंग माझ्या आयुष्यात अनेकदा आले आहेत. मात्र सर्वसामान्य जनता हीच आमची ताकद आहे. लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता, सामान्य लोकांना फोडाफोडीचे राजकारण आवडलेले नाही. सामान्य लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणार म्हणून लोक आमच्याकडे अपेक्षेने बघतात आणि ते काम आम्ही करत आहोत. असं म्हणत, एकप्रकारे, आमदार सतेज पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सज्ज असल्याचं सांगितले.

error: Content is protected !!