कलमठ घरफोडीतील चोराला 4 दिवस पोलीस कोठडी

कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ बिडयेवाडी येथील घरफोडी च्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी सचिन राजू माने उर्फ लखन अशोक कुलकर्णी याला 18 जून पर्यंत 4 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कलमठ बिडयेवाडी येथील संजय सुभाष सावंत आणि माधव संजय ढेकणे यांचे बंद घर 2 जून रोजी पहाटे फोडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 1 लाख 73 हजारांचा मुद्देमाल चोरण्यात आला होता. या घरफोडीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी सचिन माने उर्फ लखन कुलकर्णी याला एलसीबी आणि कणकवली पोलिसांनी 14 जून रोजी गोकर्ण कर्नाटक येथून ताब्यात घेत अटक केली होती. आरोपी सचिन माने याला आज तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे यांनी कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 18 जून पर्यंत चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे करत आहेत.

error: Content is protected !!