कुर्ली ग्रा.पं.सदस्य व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या माध्यमातून केला प्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील कुर्ली ग्रामपंचायतीचे सदस्य योगेश कदम तसेच गावातील कार्यकर्ते सुजित सावंत, कृष्णा कदम, गणेश गायकवाड, बाबू कदम आदींनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या वाढदिनाच्या औचित्यावर नवीन कुर्ली वसाहत येथे त्यांच्या मारूती निवास येथे हा पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला. राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, नयन गावडे, बंडू शेणवी, युवक राष्ट्रवादीचे कणकवली मतदारसंघ अध्यक्ष विरेंद्र पिळणकर, जयेश परब, बाळा मसुरकर, उत्तम तेली, सखाराम हुंबे आदी उपस्थित होते. अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे योगेश कदम व कार्यकर्त्यांनी सांगितले. या प्रवेशकर्त्या तरूणांचे स्वागत करताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पक्षाच्यावतीने त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

अनंत पिळणकर म्हणाले, कुर्ली गावाचा सर्वांगीण विकास हा हेतू नजरेसमोर ठेवून या तरूण कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पक्ष त्यांची निराशा करणार नाही. गावातील समस्या व विकासकामे मार्गी लावण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून यापुढेही आपले सर्वतोपरी सहकार्य राहील. पक्षात या कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल अशी ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!