गारपिट, वादळवाऱ्यासह पाऊस ; वाहतूक ठप्प
सावंतवाडी (प्रतिनिधी) : सह्याद्री खोऱ्यात सांगेली, माडखोल, कलंबिस्त आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यात काही ठिकाणी झाडे कोसळली.
सांगलीत जाणा-या रस्त्यावर झाड कोसळल्याने तीन तास वाहतूक वाहतूक ठप्प होती. याबाबतची माहिती गेळे सरपंच सागर ढोकरे यांनी दिली. तर दुसरीकडे कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरुर परिसरात गारांचा पाऊस झाला.
याबाबतची माहिती तेथील स्थानिकांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना दिली. पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत होता.