तळेरे (प्रतिनिधी) : उमेद फाउंडेशन कोपार्डे ता.करवीर जि.कोल्हापूर या सामाजिक संस्थेच्या वतीने कासार्डे विद्यालयास शैक्षणिक साहित्य किट वाटप करण्यात आले. उमेद फाउंडेशनतर्फे दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत असते. यावर्षी देखील कासार्डे विद्यालयाच्या १४ गरजू विद्यार्थ्यांना उमेद फाउंडेशनच्या वतीने प्रत्येकी साधारणपणे ९०० किमतीचे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आहे. याप्रसंगी कासार्डे विकास मंडळ मुंबई संस्था स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका बी. बी. बिसुरे, पर्यवेक्षक एस. व्ही. राणे, उमेदीयन जाकिर शेख, नितीन पाटील, प्रा. विनायक पाताडे व कासार्डे माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शैक्षणिक पालकत्व मोहीम, उमेद मायेचं घर सामाजिक प्रकल्प,उमेद शिष्यवृत्ती, सामाजिक दिवाळी उपक्रम अशा उमेद फाउंडेशनच्या विविध उपक्रमाबाबत उमेदीयन जाकीर शेख यांनी सविस्तर माहिती सांगितली. याप्रसंगी संजय पाताडे व बी. बी. बिसुरे यांनी उमेद फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले व विद्यार्थ्यांनी मेहनत घेत प्रगती साधण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे (किटचे) वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनसह आभार उमेदीयन प्रा. विनायक पाताडे यांनी मानले.