भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबडेकर जयंतीला रंगणार कसवणला जिल्हास्तरीय काव्यमैफल

कणकवली (प्रतिनिधी) : नक्षत्राचं देणं काव्यमंच महाराष्ट्र, विभाग सिंधुदुर्ग आयोजित काव्यमैफलीचे नि:शुल्क आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीदिनी कसवण बौद्धवाडी येथे दि. १४ एप्रिल, २०२३ रोजी जिल्हास्तरीय काव्यमैफल आयोजित केलेली आहे. यात एक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित कविता व दुसरी आपल्या आवडीची कोणतीही मराठी अगर मालवणी कविता सादर करायची आहे. तरी सहभाग घेणाऱ्या कवी/कवयित्रिंनी आपले नाव मोबाईल नंबर 9403228364 कवी उदय सर्पे व मोबाईल नंबर 9405778726 कवी राजेंद्र गोसावी, मोबाईल नंबर 9422633118 कवी सुरेश पवार, मोबाईल नंबर 9403851877 कवी नरेंद्रकुमार चव्हाण यांच्याकडे आपल्या मोबाईल नंबरसह द्यायची आहेत. सहभागी कवींना सन्मानपत्र देण्यात येणार आहे. याची नोंद घ्यावी. काव्यवाचन मैफल सकाळी १०•३० वा.कार्यक्रम स्थळ समाजमंदिर कसवण (ग्रामपंचायत कसवण-तळवडे कार्यालय जवळ) येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती नक्षत्राचं देणं काव्यमंच सिंधुदुर्गचे अध्यक्ष उदय सर्पे यांनी दिली आहे.

error: Content is protected !!