खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मस्त्योद्योग व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुरंगवणे – बेर्ले ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच व कट्टर राणे समर्थक संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे यांच्या वतीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने येथील ग्रामदैवत श्री देव गांगेश्वर देवाकडे नामदार नितेश राणे यांना उदंड दीर्घायुष्य व ऊत्तम आरोग्य लाभण्यासाठी साकडे घालण्यात आले.

यावेळी गावचे सरपंच पप्पू ब्रम्हदंडे, उपसरपंच बबलू पवार, भारतीय जनता पक्षाचे कणकवली तालुका कार्यकारणी सदस्य रवींद्र लाड, स्थानिक ग्रामस्थ पांडुरंग सुतार, अशोक जाधव, भालचंद्र सुतार, जनार्दन सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.












