दि.२२ व २३ जून २०२६ रोजी श्री महादेव मैदान नाधवडे येथे संपन्न होणार क्रिकेट स्पर्धा
वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधु नायक चषक आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाधवडे येथे संपन्न होणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास रोख रक्कम रुपये २३०२३/- तर द्वितीय क्रमांकास १५०२३/- पारितोषिकासह मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय पराभूत संघास सन्मानचिन्ह देऊन सहभागासाठी गौरविण्यात येणार आहे. एक गाव एक संघ या नियमानुसार सदर स्पर्धेत संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी २५००/- रूपये प्रवेश फी ठेवण्यात आली असून 9960051196 आप्पा कल्याणकर यांच्याकडे संपर्क साधून संघ नोंदणी करावयाची आहे. सदर स्पर्धा श्री.महादेव मैदानावर दि.२२ व २३ जून रोजी संपन्न होणार आहे.












