लग्नाच्या आमिषाने लैंगिक संबंध ; वैभववाडी तालुक्यातील आरोपी गजाआड

कणकवली (प्रतिनिधी) : सोशल मीडियावर ओळखीनंतर युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवून नंतर लग्नास नकार दिल्याच्या गुन्ह्यात वैभववाडी तालुक्यातील तिथवली गावातील युवकावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर प्रकाश बंदरकर (वय 28, रा. तिथवली, ता. वैभववाडी ) असे आरोपीचे नाव असून त्याला सोमवार 15 जून रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे . पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार याबाबत पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी किशोर आणि पीडित युवतीची इन्स्टाग्रामवर फेब्रुवारी 2026 मध्ये ओळख झाली. त्यानंतर चॅटिंग दरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. किशोर याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले. पीडित युवती ही मुंबईत खाजगी नोकरी करते. एप्रिल 2026मध्ये पीडित युवती आपल्या गावी आली होती. दरम्यान 10 एप्रिल रोजी आरोपी किशोर याने पीडित युवतीला कणकवली शहरानजीक च्या एका लॉजमध्ये नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर किशोर ला पीडितेने लग्नाबाबत विचारले असता किशोर ने लग्नास नकार दिला. लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवून नंतर लग्नास नकार दिला म्हणून पीडितेने किशोर बंदरकर विरोधात फिर्याद दाखल केली. आरोपी किशोर विरोधात बी एन एस चे कलम 64,69,75 (2),352, 351 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास महिला पीएसआय वृषाली बर्गे करत असून आरोपी किशोर बंदरकर याला आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!